काश्मीरमधील घटनाक्रम आणि लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयकावरील चर्चा सुरु आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे नजरकैदेत आहेत की त्यांच्या मर्जीने त्यांच्या घरात आहेत, यावर चर्चेप्रसंगी प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी चार वेळा उत्तर दिले. फारुख अब्दुल्ला ना अटकेत आहेत ना ते नजरकैदेत आहेत. ते आपल्या घरात मजेत आहेत, असे शहा यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारला होता. अब्दुल्लांना यायचेच नसेल त मी त्यांच्यावर पिस्तुल रोखून आणू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवल्याचे सांगत गृहमंत्रालयाचा दावा फेटाळला.
आम्ही दगड मारणाऱ्यांपैकी नाही, कोर्टात दाद मागू - फारुक अब्दुल्ला
Amit Shah in Lok Sabha:I'm saying it for the 4th time, & I've the patience to say it for the 10th time,Farooq Abdullah has neither been detained nor arrested. If he isn't well, doctors will take him to hospital. House shouldn't worry. If he wasn't well, he would not have come out pic.twitter.com/nvgO0stsRs
— ANI (@ANI) August 6, 2019
लोकसभेत जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयकावर चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज चर्चेत फारुख अब्दुल्ला यांची कमतरता जाणवत आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जागेवरुन उठून फारुख अब्दुल्ला यांना अटक ना अटक केले आहे ना नजरकैदेत ठेवलेले आहे. ते आपल्या मर्जीने घरात आहेत. त्यावर सु्प्रिया सुळे यांनी ते आजारी आहेत, त्यामुळे आले नसल्याचे म्हटले. त्यानंतर शहा यांनी यावर मी काही करु शकत नाही, मी डॉक्टर नाही, असे म्हटले.
वृत्त वाहिन्यांवर अब्दुल्लांनी त्यांना नजरकैदेत ठेवल्याचे सांगत असल्याचे खासदार शशी थरुर यांनी सांगितले. त्यावर शहा म्हणाले की, मी तीन वेळा स्पष्ट केले आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करु इच्छितो. फारुक अब्दुल्ला ना अटकेत आहेत ना नजरकैदेत. ते आपल्या घरी आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. मजेत आहेत, याची तुम्ही माहिती करुन घ्या. त्यांना यायचे नसेल तर आम्ही त्यांच्यावर पिस्तुल रोखून बाहेर आणू शकत नाही.