पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची दिली डेडलाईन

अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी डेडलाईन दिली आहे. अमित शहा यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी असे सांगितले की, 'घुसखोर करणारे राहूल बाबाचे चुलत भाऊ लागतात का? राहुल बाबाला बोलू द्या, मात्र मी हे सांगायला आलो आहे की, २०२४ च्या आधी या देशातून एक-एक घुसखोराला बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे.

 

'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'

अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शहा यांनी एनआरसीचा विरोध करणाऱ्या राहुल गांधींना लक्ष्य करत असे म्हटले आहे की, राहुल बाबा सांगतात की एनआरसी का आणत आहे? आणि घुसखोरांना बाहेर का काढले जात आहे? हे लोकं कुठे जाणार, काय घालणार आणि काय खाणार? झारखंडच्या बहरागोडा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.  

मंत्र्यांना बंगल्याचे वाटप जाहीर; या ठिकाणी राहणार हे मंत्री

झारखंडने अनेक सरकार पाहिले आहे. मात्र कोणीच विकासाला गती आणू शकले नाही. कारण कोणतेच सरकार पूर्ण बहुमताचे नव्हते. २०१४ मध्ये देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळाले आणि झारखंडच्या रघुवर दास यांना पूर्ण बहुमत मिळाले. परिणामी, आज झारखंड विकासाच्या मार्गावर पुढे गेला आहे.

हे फक्त रोहितलाच जमेलं, धमाकेदार खेळीनंतर वॉर्नरने केली भविष्यवाणी