पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'७० वर्षात जे झाले नाही ते मोदींनी ७५ दिवसात केले'

अमित शहा

हरयाणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जींद येथे रॅली झाली. या रॅली दरम्यान त्यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या रॅली दरम्यान त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. वोटबँकच्या लोभापोटी काँग्रेस सरकार ७० वर्षात जे करु शकली नाही ते मोदी सरकारने अवघ्या ७५ दिवसांमध्ये करुन दाखवले, असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे.

 

भविष्यात अण्वस्त्रांचा वापर त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून - राजनाथ सिंह

कलम ३७० रद्द करणे हे खूप मोठे काम होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारत हे स्वप्न होते. मात्र त्यामध्ये कलम ३७० अडथळा होता. कलम ३७० हटवण्याचे काम तोच करुन शकतो ज्याच्या मनामध्ये वोटबँकेचा लोभ नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच वोटबँकेच्या लोभात पडले नाहीत. त्यांनी नेहमी भारताच्या भवितव्यासाठी निर्णय घेतले, असे अमित शहा यांनी सांगितले.

'नमाज पठण करतात म्हणून मुस्लिम बांधव रस्त्यावर हक्क सांगू

पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी हरयाणाला आलो होतो. तेव्हा ४७ जागांसह भाजप सरकारची स्थापना झाली होती. यावेळी मी परत आलो आहे. तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की ७५ जागांसह मनोहर सरकारची स्थापना करा. मनोहर लाल खट्टर यांनी हरयाणामधील भ्रष्टाचाराला भूतकाळ बनवले असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी