पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील अटलबिहारी वाजपेयींचा बंगला अमित शहा यांना देण्यात येण्याची शक्यता

अमित शहा

दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा बंगला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिली.

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी करार

केंद्रीय गृहमंत्र्यांसाठी कृष्ण मेनन मार्गावरील ६ ए निवासस्थान राखीव ठेवण्यात आले आहे. हे निवासस्थान वापरण्यास सुरुवात होण्यास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. विशेष सुरक्षा दलांकडून (SPG) या बंगल्याला परवानगी घ्यावी लागेल, असे गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

अमित शहा हे राज्यसभेचे सदस्य झाल्यावर त्यांना अकबर रस्त्यावरील बंगला देण्यात आला होता. २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी कृष्ण मेनन मार्गावरील बंगल्यामध्ये स्थलांतरित झाले होते आणि ते १४ वर्षे तिथेच राहिले. या निवासस्थानाचा क्रमांक ८ कृष्ण मेनन मार्ग असा होता. तो नंतर ६ ए कृष्णमेनन मार्ग असा करण्यात आला.

RSS च्या कार्यकर्त्यांसारखे प्रचार करायला शिका : शरद पवार

जनरल पूल रेसिडेन्शियल अकॉमोडेशन कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारितील बंगल्यांचे वाटप होत असते. अमित शहा यांच्याकडे केंद्र सरकारमधील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. त्यामुळे त्यांना बंगला देताना तेथील सुरक्षासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे.