पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मंत्रिगटांमध्ये अमित शहा यांची नियुक्ती

नरेद्र मोदी आणि अमित शहा

सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध मंत्रिगटाची आणि त्यातील सदस्य मंत्र्यांची पुनर्रचना केली. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण आठ महत्त्वाच्या मंत्रिगटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहाच मंत्रिगटांचे नेतृत्त्व करणार आहेत. संसदीय कामकाज आणि निवासव्यवस्था या दोन विषयांवरील मंत्रिगटांमध्ये नरेंद्र मोदी यांचा समावेश नाही. सर्व महत्त्वाच्या मंत्रिगटांमध्ये अमित शहांचे असणे, त्यांचे केंद्र सरकारमधील पद किती महत्त्वाचे आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित करणारे आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

मंत्रिमंडळ नियुक्ती या विषयावरील मंत्रिगटामध्ये मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एकूण सहा मंत्रिगटांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये निवासव्यवस्था, आर्थिक व्यवहार, संसदीय कामकाज, राजकीय विषय, सुरक्षा, गुंतवणूक आणि विकास, रोजगार आणि कौशल विकास यांचा समावेश आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नियुक्ती केवळ दोनच मंत्रिगटांमध्ये करण्यात आली आहे. सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार या दोनच विषयांवरील मंत्रिगटांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा विषयक मंत्रिगट हा सर्वात महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. या मंत्रिगटामध्ये राजनाथ सिंह यांच्यासोबत नरेंद्र मोदी, सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. 

अजित डोवाल पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

केंद्रीय रस्तेविकास आणि लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश चार मंत्रिगटांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये निवासव्यवस्था, आर्थिक व्यवहार, राजकीय विषय आणि गुंतवणूक व विकास या विषयावरील मंत्रिगटांचा समावेश आहे.