पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, शहांचा काँग्रेसवर पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. सध्याच्या घडीला राजकारण बाजूला ठेऊन राष्ट्रहिताचा विचार करणे गरजेचे आहे. देशातील जनतेमध्ये कोणताही संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न करु नका, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसला सुनावले. अमित शहा यांनी ट्विट्च्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

 

राज्यातील ३० शासकीय रुग्णालये 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत

कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये १३० कोटी भारतीय जनता एकजूट दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांबद्दल जगभरातून कौतुक होत आहे, असा उल्लेखही शहा यांनी ट्विटमध्ये केलाय. कोरोना विषाणूमुळे  देशात ओढावलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर काँग्रेस कार्यकारणी समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. लॉकडाऊन आवश्यक आहे पण निर्णय घेण्यापूर्वी सामान्य जनतेचा विचार केलेला नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली होती.  

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश

काँग्रेसच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी. पी. चिदंबरम, गुलाब नबी आझाद यांच्यासह अन्य नेतेमंडळी देखील उपस्थितीत होती. लॉकडाऊनचा निर्णय लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने एक विेशेष रणनिती आखायला हवी होती. सरकारने  पूर्व नियोजन केले असते तर सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला नसता, असा उल्लेखही सोनिया गांधी यांनी केला होता. विशेष म्हणजे यापूर्वी कोरोनाविरोधातील लढ्यात मोदी सरकारसोबत आहोत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Home Minister Amit Shah attack congress over Sonia Gandhi statement regarding Corona lockdown says stops playing petty politic