पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर राहुल बाबांना इटलीच्या भाषेत कायदा समजावू : अमित शहा

अमित शहा आणि राहुल गांधी

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. राहुलबाबा तुम्ही सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात अभ्यास केला असेल तर चर्चा करण्यासाठी या! जर तुम्ही कायद्यातील तरतुदी वाचल्याच नसतील तर हरकत नाही. तुम्हाला सुधारित नागरिकत्व कायद्यातील तरतुदी इटालियन भाषेत भाषांतर करुन पाठवतो, अशा शब्दांत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा समर्थन रॅलीत ते बोलत होते.

पाकविरुद्धच्या युद्धांचे दाखले देत काँग्रेसने साधला PM मोदींवर निशाणा

काँग्रेस मतांच्या राजकारणासाठी कायद्यासंदर्भात अपप्रचार करत आहे. त्यामुळे भाजपला सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनजागृती मोहिम काढावी लागली, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. शहा म्हणाले की, काँग्रेस, ममतादीदी, बसपा, केजरिवाल कम्युनिस्ट सर्वजण सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत. या सर्वांना मी आव्हान देतो की, त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. सर्व विरोधी पक्ष या कायद्याच्या विरोधात एकवटले असले तरी आम्ही एक इंच सुद्धा मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. 

भारताचे PM आहात की पाकचे अँबेसिडर? ममतांचा मोदींना सवाल

यावेळी अमित शहा यांनी नेहरु-लियाकत अली कराराचा दाखलाही दिला. या करारानुसार दोन्ही राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना संरक्षणाचा विश्वास देण्यात आला आहे. आपल्याकडे या कराराचा मान राखला गेला. मात्र शेजारील राष्ट्रात तसे झाले नाही. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदाय २३ टक्केवरुन ३ टक्के इतका झालाय. भाजप सरकारच्या या निर्णयामुळे अल्पसंख्यांकांना दिलास मिळेल. जे त्यांना तिकडे सहन करावे लागले ते इथे कदापी होणार नाही. मोदींच्या राज्यात कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मोदी सरकार पीडित अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करेल, असेही शहा यांनी म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: home minister amit shah addressed abhinandan samaroh in jodhpur rajasthan and attack on congress Rahul Gandhi on caa