पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया परिसरातील गोळीबाराच्या घटनेवर अमित शहा म्हणाले...

अमित शहा

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील मोर्चापूर्वी दिल्लीतील जामिया परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार असा प्रकार कदापी सहन करणार नाही, असे सांगत त्यांनी असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. 

जामिया परिसरात तरुणाचा गोळीबार, एक जण जखमी

एएनआयच्या वृत्तानुसार अमित शहा म्हणाले की, दिल्लीतील जामिया परिसरातील घटनाही निंदणीय आहे. यासंदर्भात मी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असून घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.  केंद्र सरकार अशा प्रकारच्या घटना कदापी सहन करणार नाही. याप्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली जाईल. दोषीची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे शहा यांनी म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाचा दणका; अनुराग ठाकूर यांना प्रचार करण्यास बंदी

सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भातील विरोधाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मोर्चापूर्वी एका तरूणाने आपल्या हातातील पिस्तूलाने एका विद्यार्थ्यावर गोळीबार केला होता. 'ये लो आझादी...' असे शब्द गोळीबार करत असताना तरुणाने उच्चारले होते. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून गोळीबार करण्यात आलेला तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जामिया समन्वय समितीने महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुधारित नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित एनआरसीविरोधात गुरुवारी राजघाटापर्यंत मोर्चा आयोजित केला आहे. याच मोर्चाच्या सुरुवातीला ही घटना घडली.