पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणुकीच्या डिजिटल वार्तांकनासाठी हिंदूस्थान टाइम्स आणि एडिटरजी एकत्र

हिंदूस्थान टाइम्स मराठी

लोकसभा निवडणूक २०१९ च्या सर्वांगी वार्तांकनासाठी देशातील सर्वात मोठा माध्यम समूह हिंदूस्थान टाइम्सने एडिटरजी या व्हिडिओ न्यूज अ‍ॅपशी करार केला आहे. हिंदूस्थान टाइम्स आणि एडिटरजी या दोन्हींच्या माध्यमातून प्रेक्षकांना वृत्त वाहिन्यांना पर्याय ठरतील, असे कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये मुलाखती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यावर आधारित कार्यक्रम यांचा समावेश असेल. प्रेक्षकांना हिंदूस्थान टाइम्सच्या वेबसाईट, सोशल मीडिया व्यासपीठ आणि मोबाईलवर हे कार्यक्रम दिसतील. एडिटरजी अ‍ॅपवर हिंदूस्थान टाइम्सच्या व्हिडिओसाठी एक वेगळी प्ले-लिस्ट तयार करण्यात आली आहे. हिंदूस्थान टाइम्स आणि एडिटरजी दोन्हीही एकत्रितपणेही काही कार्यक्रमांची निर्मिती करणार आहेत. यामध्ये हिंदूस्थान टाइम्सचा संपादकीय विभागातील पत्रकार असतील आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार विक्रम चंद्रा यांच्याकडे असेल.

येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होते आहे. त्या दिवशी एडिटरजी अ‍ॅपकडून काही विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. यामध्ये विक्रम चंद्रा यांच्यासोबत हिंदूस्थान टाइम्सचे वरिष्ठ राजकीय पत्रकार, राजकीय नेते, राजकीय विश्लेषक आणि माहिती अभ्यासक यांचा समावेश असेल. हा कार्यक्रम hindustantimes.com (इंग्रजी, मराठी आणि पंजाबी वेबसाईट), livehindustan.com आणि livemint.com या वेबसाईटवर उपलब्ध असेल. या कार्यक्रमांची सविस्तर रुपरेषा आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होत आहेत, हे लवकरच जाहीर केले जाईल.

हिंदूस्थान टाइम्स आणि एडिटरजी अ‍ॅप यांच्या माध्यमातून होणारे वार्तांकन या स्वरुपातील देशातील सर्वात मोठे पाऊल ठरेल. त्याचबरोबर दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच विक्रम चंद्रा आणि इतर वरिष्ठ पत्रकार हे वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रातून बाहेर पडून डिजिटल क्षेत्रात उतरत आहेत. 

या संदर्भात बोलताना एचटी डिजिटल स्ट्रिम्सच्या चीफ काँटेट ऑफिसर नीलांजना भादुरी झा म्हणाल्या, माध्यम क्षेत्रात नवे घडवण्यामध्ये हिंदूस्थान टाइम्स कायमच आघाडीवर असतो. युजर्सना सातत्याने नवा अनुभव देण्याचा आणि नवे काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एडिटरजी अ‍ॅप, त्याचबरोबर वरिष्ठ पत्रकार विक्रम चंद्रा यांच्यासोबत मतमोजणीच्या दिवशी फक्त डिजिटल माध्यमातून नव्या स्वरुपात वार्तांकन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या नव्या प्रयत्नाबद्दल आम्ही खूप आनंदी आणि उत्साही आहोत.

एडिटरजी अ‍ॅपचे संस्थापक विक्रम चंद्रा म्हणाले, निवडणूक निकालांची माझी पहिली आठवण म्हणजे १९७७ मध्ये हिंदूस्थान टाइमच्या इमारतीपुढे उभे राहून मोठ्या स्क्रिनवर निकाल पाहणे ही आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांसाठी त्याच समूहासोबत काम करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.  निवडणूक निकालांच्या दृष्टीने डिजिटल क्षेत्रात २३ मे २०१९ सर्वात यशस्वी ठरविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

एचटी डिजिटल स्ट्रिम्स - देशातील सर्वात प्रभावशाली माध्यम समूहांपैकी एक असलेल्या एचटी डिजिटल स्ट्रिम्सकडे सध्या ५ कोटी युनिक व्हिजिटर्स आहेत. देशातील सर्वांत वेगाने प्रगती करीत असलेली ही एक डिजिटल माध्यम कंपनी आहे. हिंदूस्थान टाइम्सच्या गौरवाशील पत्रकारितचे वारसा पुढे घेऊन निघालेल्या एचटी डिजिटल स्ट्रिम्सकडे hindustantimes.com, livehindustan.com आणि livemint.com आणि desimartini.com या प्रमुख वेबसाईट्स आहेत. देशातील युजर्सना माहिती देणे आणि त्यांचे मनोरंजन करण्याचे काम आमच्याकडून केले जाते. उत्कृष्ट मजकूर आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने विश्वासू माध्यम व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एचटी डिजिटल स्ट्रिम्स कटिबद्ध आहे. 

एडिटरजी अ‍ॅप - आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित वैयक्तिक उपयोगी स्वरुपाचे व्हिडिओ प्रसारित करण्याचे हे व्यासपीठ आहे. वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रातील देशातील मोठे नाव असलेले वरिष्ठ पत्रकार विक्रम चंद्रा यांनी या अ‍ॅपची सुरुवात केली आहे. ndtv.com च्या यशस्वी उभारणीतही त्यांची मोठी भूमिका होती. प्रेक्षकांना हवे असलेले व्हिडिओ त्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर या क्षेत्रातील कंपन्यांना त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाईल. प्रेक्षकांना सर्व ताज्या घडामोडींची माहिती आणि त्यांना हव्या असलेल्या विषयातील घडामोडींची माहिती या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध आहे. विक्रम चंद्रा हे एनडीटीव्ही ग्रुपचे सीईओ राहिले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hindustan Times and Editorji Join Hands For a Content Partnership For The 2019 Lok Sabha Elections