पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१६ वर्षांचा हिशोब द्या! आम्ही ७० वर्षांचा देतो, काँग्रेसचा भाजपला टोला

गौरव वल्लभ

हिंदुस्थान शिखर संमेलनच्या पाचव्या हंगामात काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी भाजपवर निशाणा साधाला आहे. भाजप सरकारने १६ वर्षांचा हिशोब द्यावा त्यानंतर आम्ही ७० वर्षांत काय केले ते सांगतो, असे गौरव वल्लभ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही लक्ष्य केले.   

 

 HT शिखर परिषदः NRC झाल्यास देशातून ८ कोटी मुसलमान बाहेर जातील- ओवेसी

काँग्रेस नेता म्हणाले, भाजपने आपल्या मर्यादा लक्षात ठेवून कामावर लक्ष दिले असते तर थोडे फार काम झाले असती. पण अर्धा तास बोलताना भाजपवाले १० वेळा नेहरुजी आणि २० वेळा इंदिराजींच नाव घेतात. ४० वेळा सोनिया गांधीं तर ५० वेळा राहुल गांधींचे नावाशिवाय त्यांना दुसरा विषय सुचत नाही. त्यांनी देशातील युवा, महिला आणि जीडीपी यावर बोलायला हवे. राहुल गांधी पंतप्रधान असते तर यावर या मुद्यावर नक्की बोलले असते. पण सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनी जीडीपीसंदर्भात उत्तर द्यायला पाहिजे. 

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात गुन्हा दाखल

भाजप सरकार ७० वर्षांत काँग्रेसने काय केले याचा हिशोब विचारत आहे. त्यांनी पहिल्यांदा १६ वर्षांचा हिशोब द्यावा त्यानंतर आम्ही ७० वर्षांत काय केले हे सांगतो, असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला. हिंदुत्वाच्या राजकारणावरही त्यांनी भाजपवर तोफ डागली. कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा मला धर्माचे ज्ञान अधिक आहे. पण धर्मावर बोलून देशाचे पोट भरणार नाही. सरकार रोजागाराच्या मुद्यावर बोलायला तयार नाही. महागाईचा मुद्दा येतो तेव्हा भाजपचे मंत्री कांदा खात नसल्याचे सांगतात. बरोजगाराचा मुद्दा येतो तेव्हा ओला उबेरवर खापर फोडतात, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर निशाणा साधला.    
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:hindustan shikhar samagam 2020 congress leader gaurav vallabh says bjp first give answer of 16 year government then congress will give