पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम लवकरच संपूर्ण देशात - अमित शहा

अमित शहा

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा NRC कार्यक्रम लवकरच संपूर्ण देशात राबविला जाईल आणि देशातील नागरिकांची नोंदणी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी स्पष्ट केले. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची मागणी होत असताना तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला जात असतानाच दुसरीकडे अमित शहा यांनी संपूर्ण देशात हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर करून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

'हिंदुस्थान टाइम्स' समुहातील 'हिंदुस्थान' या हिंदी दैनिकाने रांचीमध्ये आयोजित केलेल्या 'पूर्वोदय हिंदुस्थान' कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, भारताचा नागरिक अमेरिका, इंग्लंड, रशिया देशांमध्ये जाऊन बेकायदा राहू शकतो का, याचे उत्तर अर्थात नाही असेच आहे. मग इतर देशाचे नागरिक भारतात कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय बेकायदा कसे काय राहू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार असल्याचे अमित शहा म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस संस्कृतीपासून देशातील नागरिक मुक्त झाले असल्याचे सांगून ते म्हणाले, या निवडणुकीत लोकांनी भ्रष्टाचार आणि एकाच कुटुंबाचे लांगूलचालन या विरोधात आपले मत नोंदविले आहे. देशात विरोधी पक्ष राहिला पाहिजे, असे मला वाटते. पण असा विरोधी पक्ष तयार करण्याची जबाबदारी माझी निश्चितच नाही. 

दमदार! विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय कुस्तीपटू

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. या निर्णयावर जगातील देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत देशातील नक्षलवाद संपविण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये नक्षलवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.