पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण केले'

रविशंकर प्रसाद

कलम ३७० रद्द करण्याची देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची इच्छा होती. पण पुरेसे बहुमत असतानाही आधीच्या सरकारांनी हा निर्णय घेतला नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने धाडस दाखवत हा निर्णय घेतला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. हिंदुस्थान टाइम्स समूहातील 'हिंदुस्थान' या हिंदी दैनिकाने रांचीमध्ये आयोजित केलेल्या 'पूर्वोदय हिंदुस्थान' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

अयोध्या प्रकरण : युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत

आपल्या भाषणामध्ये रविशंकर प्रसाद यांनी सविस्तरपणे कलम ३७० कशा पद्धतीने उपयुक्त नव्हते आणि त्यामुळे जम्मू-काश्मिरचे नुकसानच झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ४२ हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. काश्मिरी पंडितांवर बलात्कार झाले. त्यांना राज्यातून हाकलून देण्यात आले. राज्यात गुर्जर, बकरवाल्स, गिड्डीस यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये कोणतेही आरक्षण मिळाले नाही. भ्रष्टाचारविरोधी कायदा, शिक्षण हक्क कायदा, माहितीचा अधिकार, बालविवाह विरोधी कायदा हे सर्व या राज्यात अमलात आणले गेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर असल्यामुळेच कलम ३७० रद्द करणे शक्य झाले आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी कलम ३७० बद्दल सरदार वल्लभभाई पटेल यांचे काय विचार होते, याचीही माहिती दिली.

हिंदी भाषा लादणं चुकीचं : रजनीकांत

केंद्र सरकारच्या ताकदीवर आणि हिम्मतीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. जर आपल्याला आपल्याच ताकदीवर विश्वास नसेल, तर देश म्हणून उभे राहण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही, असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटले होते, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hindustan Purvoday Summit PM Narendra Modi fulfilled Patels wish on Article 370 says Ravi Shankar Prasad