पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मांसाहारी लोकांना शिक्षा देण्यासाठी कोरोना अवतार, हिंदू महासभेचे मत

कोरोनाचा फैलाव (प्रातिनिधिक छायाचित्र)

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण चीनसह जगातील इतर देशांमध्ये सध्या काहीसे भितीचे वातावरण आहे. पण कोरोना हा विषाणू नसून, मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी घेतलेला अवतार असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी हे वक्तव्य केले आहे.

इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे: उद्धव ठाकरे

जगातील जास्तीत जास्त लोकांनी शाकाहाराकडे वळावे. मांसाहार करणे बंद करावे, म्हणूनच हा अवतार घेण्यात आला आहे. यावर कोणाचा विश्वास बसू दे किंवा न बसू दे पण हे वास्तव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या चीनमध्ये या विषाणूचा सर्वाधिक फैलाव झाला आहे. त्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे मार्गही असल्याचे स्वामी चक्रपाणी यांनी सांगितले.

स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले आहे की, या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कोरोनाची मूर्ती तयार करावी आणि या मूर्तीपुढे माफी मागावी. त्याचबरोबर देशातील कोणत्याही जीवाला यापुढे कधीही त्रास देणार नाही, असे या मूर्तीपुढे सांगावे. 

शाहिन बाग : आंदोलन करा पण रस्त्यावर नको - सुप्रीम कोर्ट

जर चीनमधील लोकांनी आणि क्षी जिनपिंग यांनी आपले म्हणणे ऐकले तर हा कोरोना अवतार परत जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.