पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

कमलेश तिवारी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. खुर्शीदाबाग येथे दिवसाढवळ्या गोळ्या झाडून कमलेश तिवारींची हत्या करण्यात आली आहे. जखमी झालेल्या कमलेश तिवारी यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये तणावाचे वातावरण आहे.

'राष्ट्रवादीला नॅनोपार्टी केल्याशिवाय थांबणार नाही'

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कमलेश तिवारी यांना फोन करुन त्यांना भेटण्यासाठी कार्यालयावर आले होते. आरोपींनी सोबत आणलेल्या मिठाईच्या बॉक्समध्ये चाकू आणि बंदूक आणली होती. त्याठिकाणी आरोपींनी चहा प्यायला त्यानंतर कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करत त्यांच्या शरीरावर चाकूने वार केले. कमलेश तिवारी यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. 

भाजपवाले इतिहासही बदलतील म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवा - पवार

दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत कमलेश तिवारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर पोलिसांना काडतूस आणि चाकू सापडला आहे. या घटनेनंतर खुर्शीदबाग परिसरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

PMC: खातेधारकांना हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश