पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदी भाषा लादणं चुकीचं : रजनीकांत

रजनीकांत

हिंदी भाषा लादणं चुकीचं आहे, दक्षिणेतील कोणतंच राज्य हिंदीची सक्ती जुमानणार नाहीत असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. देशभर हिंदी ही एकच राष्ट्रभाषा असावी या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेक दाक्षिणात्य नेत्यांनी विरोध केला आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, अभिनेते आणि मक्कल निधी मैयमचे संस्थापक कमल हासन यांचाही  समावेश आहे. 

अयोध्या प्रकरण : युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबरची अंतिम मुदत

आता हिंदीच्या वादात रजनीकांत यांनीही उडी घेतली आहे. 'हिंदी भाषा ही लादली जाऊ नये. केवळ तामिळनाडूतच नाही तर दक्षिणेतलं कोणतंही राज्य ही भाषा स्वीकारणार नाही. केवळ हिंदीच नाही तर कोणत्याही भाषेची सक्ती करु नये. एकच भाषा असणं हे  देशाच्या प्रगती आणि ऐक्यासाठी चांगलं आहे पण त्यासाठी कोणत्याही भाषेची सक्ती करणं  हे मान्य नाही' असं रजनीकांत एएनआयला  दिलेल्या मुलाखातीत म्हणाले. 

तर दुसरीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्द्यावरून  मक्कल निधी मैयमचे संस्थापक कमल हासन यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. 'आम्ही सर्व भाषांचा आदर करतो मात्र आमची मातृभाषा ही तामिळच राहिल. भाषेवरून देशात यादवी माजणे हे  परवडण्यासारखे नाही असं कमल हासन म्हणाले.

'... म्हणून ब्राह्मण समाजाने भाजपविरोधात मतदान करावे'

तर 'कर्नाटकात कन्नड हिच मुख्य भाषा राहिल आणि त्यात तडजोड केली जाणार नाही सर्व भाषा या समान आहेत मात्र आमच्या राज्यात कन्नडचे महत्त्व हे अबाधित राहिल असं  माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले होेते.