पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिमाचल प्रदेश : कुल्लू जिल्ह्यात बस दरीत कोसळून ४३ जणांचा मृत्यू

कुल्लू जिल्ह्यात भीषण अपघात

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील बंजार ते गाडागुशैनी दरम्यान प्रवास करणारी खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

राज्याचे परिवहन मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी अपघातासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कुल्लू  पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,  (बस क्रमांक एचपी ६६-७०६५) जिल्ह्यातील  बंजार तालुक्यातील धोथ मोरजवळ ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे.

AN 32 विमान अपघातः ६ जवानांचे मृतदेह तर ७ जणांचे अवशेष सापडले

ट्रॅफिकच्या समस्येमुळे बस नियोजित वेळेपेक्षा उशीराने बंजाराहून निघाली होती. ४२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बसमध्ये अधिक प्रवासी बसवल्याची माहिती समोर येत आहे. अपूऱ्या आणि चढ असलेल्या रस्त्यावरुन प्रवास करताना बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे ब्रेक न लागल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: himachal pradesh kullu private bus fall in the chasm at banjar of kullu district The bus carrying around 50 passengers