पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाडेवाढ करा नाहीतर बेमुदत संपावर जाण्याचा रिक्षाचालकांचा इशारा

प्रातिनिधिक छायाचित्र

आमच्या मागण्या या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्यातील ऑटोरिक्षा कृती समितीने दिला आहे. समितीची बैठक मुंबईत झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला.

आपल्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्या संदर्भात कोणती पावले टाकायची हे निश्चित करण्यासाठी गोरेगावमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षाच्या किमान भाड्यात वाढ करावी, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची निर्मिती करावी, भविष्य निर्वाह निधी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्याचबरोबर ऍप आधारित टॅक्सीसेवा बंद कराव्यात, या कृती समितीच्या मागण्या आहेत.

आपल्या मागण्या लावून धरण्यासाठी पुढील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागांत आम्ही आंदोलन करणार आहोत, असे कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.