पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी कोणत्या वयोगटामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी किती आहे, याची माहिती देण्यात आली. यामध्ये ० ते २० वयोगटामध्ये ही टक्केवारी ९ इतकी आहे. २१ ते ४० वयोगटामध्ये हे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के आहे. ४१ ते ६० वयोगटामध्ये ही टक्केवारी ३३ इतकी आहे. तर ६१ पेक्षा जास्त वयोगटामध्ये हे प्रमाण १७ टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांनी ही माहिती दिली.

ताप, खोकला असल्यास सामान्य रुग्णालयात जाऊ नका - मुख्यमंत्री

लव आगरवाल म्हणाले, कालपासून आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०१ ने वाढली आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ इतकी झाली आहे. काल कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत पावलेल्यांची संख्या ६८ इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात १८३ जणांना आजारातून बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोविड-१९ : देशातील पहिल्या कोरोनाग्रस्त डॉक्टरची यशस्वी प्रसूती

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी १०२३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण १७ राज्यांमध्ये हे सर्व रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी ३० टक्के रुग्ण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत, असेही लव आगरवाल यांनी सांगितले. तबलिगी जमातच्या कार्यक्रमात असलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या २२ हजार जणांना आतापर्यंत विलग करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले.