पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बगदादीला पकडताना जखमी झालेला शूर श्वान सेवेत रुजू

शूर श्वान  सेवेत रुजू

आयसीसचा म्होरक्या असलेला अबु अल् बगदादीला शोधण्यात मोठी कामगिरी बजावणाऱ्या अमेरीकनं श्वान पथकातील तो  जखमी श्वान आता सेवेत रुजू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी व्हाइट हाऊसमधून आयसीसचा म्होरक्या असलेला अबु अल् बगदादी ठार झाल्याचं जाहीर केले.  

त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका श्वानाचा फोटो शेअर केला. अबु अल बगदादीला शोधण्यात आणि त्याचा खात्मा करण्यात या श्वानाची खूप मदत झाली. या श्वानानं खूप मोठी कामगिरी पार पाडली अशा शब्दात ट्रम्प यांनी  श्वानाचं कौतुक केलं होतं. 

आयसिसच्या म्होरक्याविरोधातील कारवाईचा व्हिडिओ

मात्र अमेरिकन सैन्यास पाहताच अंगावरील स्फोटकांच्या जॅकटचा स्फोट घडवून  बगदादीनं आत्महत्या केली. या स्फोटात श्वान जखमी झाला होता. सुरक्षेच्या कारणावरून या श्वानाचं नाव सांगितलं नव्हतं. जखमी श्वानावर गेले काही दिवस उपचार सुरु होते. आता हा श्वान ठिक असून तो सेवेत रुजू झाला आहे अशी माहिती अमेरिकन सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

कराची-रावलपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; १६ प्रवाशांचा मृत्यू

सैन्यदलात  असलेल्या श्वानांची दहशतवाद्यांना पकडण्यात खूप मोठी मदत होते. श्वानपथक हे अमेरिकन सैन्यदलाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जीव वाचतात असंही कौतुक सैन्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.

७२ वर्षाचा इतिहास बदलला; जम्मू-काश्मीर, लडाख नवे केंद्रशासित प्रदेश