पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, पीडितेच्या वडिलांनी मानले हैदराबाद पोलिसांचे आभार

छाया सौजन्य : ANI

हैदराबाद पशुवैद्यकिय महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले आहेत. या  चारही आरोपीनं २७ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिला जाळून टाकलं होतं, या  नराधमांचा खात्मा केल्याबद्दल पीडितेच्या वडिलांनी हैरदाबाद पोलिस आणि  राज्य सरकारचे आभार मानले आहेत. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभली अशी भावना पीडितेच्या वडिलांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. 

हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा लावला पोलिसांनी नराधमांचा छडा

'माझ्या मुलीचा मृत्यू होऊन आज १० दिवस उलटले. आज कुठे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभली असेन. मी यासाठी पोलिस आणि सरकारचा आभारी आहे', अशा भावना पीडितेच्या वडिलांनी  एएनआयशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

आरोपींना दिलेल्या शिक्षेवर मी खूश; निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं 
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी ३६ तासातच चारही आरोपींना अटक केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या ४ आरोपींची नावे आहेत. यामधील तीन आरोपी २० वर्षाचे तर एक २६ वर्षाचा होता. चारही आरोपी तेलंगणामध्येच राहणारे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिस तपासासाठी शुक्रवारी पहाटे ३ वाजता आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत आरोपींवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये चारही आरोपींचा खात्मा झाला. 

हैदराबाद बलात्कार : जिथे ते पाशवी कृत्य केले तिथेच सर्व मारले गेले..