पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंड : हेमंत सोरेन ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

हेमंत सोरेन

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते हेमंत सोरेन आज (२९ डिसेंबर) रोजी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपाल द्रोपदी मुर्म त्यांना राजधानीतील मोरहाबादीच्या मैदानात पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यांच्यासोबत प्रो. स्टीफन मरांडी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रामेश्वर उरांव हे देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ४४ वर्षीय हेमंत सोरेन दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये त्यांनी काँग्रेस आघाडीसोबतच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

'प्रियांका गांधींसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा' 

झारखंडमधील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील काँग्रेसचे प्रभारी आरपीएन सिंह यांनी रांचीमध्ये दाखल होत काँग्रेसकडून कोणत्या मंत्र्यांनी शपथ घ्यावी यांसदर्भातील पेच सोडवण्याच्या दृष्टिने हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी रामेश्वर उरांव,आलमगीर आलम आणि राजेंद्र सिंह यांची नावे शर्यतीत होती. यासंदर्भात आरपीएन सिंह यांनी  हेमंत सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. 

चड्डीवाल्या RSS च्या हातात सत्ता द्यायची नाही : राहुल गांधी

हेमंत सरकारमध्ये स्टीफन मरांडी आणि रामेश्वर उरांव यांना उपमुख्यमंत्री पद देत स्थिर सरकारच्या दृष्टिने पाऊल उचलण्यात आले आहे.  हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर रविवारीच कॅबिनेटची पहिली बैठक सध्याकाळी पार पडणार आहे.