पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पवारांना प्रेरणादायी मानणारे सोरेन या तारखेला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

हेमंत सोरेन

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी  सरकार स्थापनेचा दावा केला. यासंदर्भात मंगळवारी हेमंत सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेतली. ५० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत त्यांनी सरकार स्थापनेसंदर्भातील पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले. 

 

'शरद पवारांनी आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली'

राज्यपालांच्या भेटीनंतर सोरेन म्हणाले की, आम्ही संख्याबळाचा आकाडा सांगत राज्यापालांना सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे अशी विनंती केली आहे. हेमंत सोरेन २९ डिसेंबर रोजी दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 
झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागेवर झालेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद महाआघाडीने सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. मंगळवारी हेमंत सोरेन यांची महाआघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. पक्षाचे प्रवक्ता सुप्रियो भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी नियुक्ती केली.  

NPR प्रक्रियेचा NRC शी काहीही संबंध नाही : अमित शहा

झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएम-काँग्रेस-राजद महाआघाडीने ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत. अबकी बार ६५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला याठिकाणी केवळ २५ जागावर समाधान मानावे लागले. एवढेच नाही तर भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारासह दिग्गज मंत्र्यांना झारखंडमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. झारखंडच्या पराभवासह भाजपने देशातील पाचव्या राज्यातील सत्ता गमवावी लागली आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर  झारखंडच्या रुपात भाजपने पाचव्या राज्यातून सत्ता गमावली आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर जेएमएम-काँग्रेस-राजद महाआघाडीचे अभिनंदन केले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर असल्याची प्रतिक्रिया दिली होती.