पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस; दोघांचा मृत्यू

मध्य प्रदेश पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेशच्या अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. भोपाल आणि विदिशामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मंडला जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. तर पावसामुळे सिहोरमध्ये पार्वती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

विक्रम लँडरशी संपर्क का होऊ शकत नाही माहितीये?

येत्या ३ ते ४ दिवसात मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भोपालसह मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सिवनी-वैनगंगा नदीमध्ये तीन लोकं वाहून गेली आहेत. यामधील एकाला वाचवण्यात यश आले आहे तर दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.  

पाकचा कुटील डाव; मसूद अझहरला गुप्तपणे कारागृहातून सोडलं

सिवनी येथे गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी कमरे इतके पाणी साचले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपालसहित अनेक भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आलेल्या पूराचे पाणी अनेक भागामध्ये शिरले आहे. पंचशीलनगर, नया बसेरा, राजीवनगर आणि अन्य परिसरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हवलवण्यात आले आहे.

US Open 2019: नदालच चॅम्पियन, रशियाच्या मेदवेदेववर मात 

मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेशमधील अनेक धरणं भरली आहेत. बरगी धरणाचे २१ दरवाजे खोलण्यात आले आहेत. धरणाचे पाणी नर्मदा नदीमध्ये सोडल्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सिवनी जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेला संजय सरोवर धरणांचे ५ दरवाजे खोलण्यात आले आहेत. पूराचे पाणी भोपाळ-सागर मार्गावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

बुलढाण्यात पाय आणि तोंड बांधलेले ६० मृत श्वान आढळल्याने