पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुजरातमध्ये मुसळधार; भरुच, नर्मदा, वडोदरा जिल्ह्यात हाय अलर्ट

गुजरात पाऊस

मध्य प्रदेशपासून ते गुजरातपर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशच्या ३२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. गावापासून ते शहरापर्यंत सगळीकडे पूराचा फटका बसला आहे. तर गुजरातला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अहमदाबाद, राजकोट, भरुच आणि नर्मदा जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

काश्मीर भारताचेच! जिनेव्हात पाक परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य

गुजरातमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी १३६ मीटरपर्यंत वाढली आहे. धरणाचे ३० पैकी २३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून ६.१६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नर्मदा नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने नर्मदा नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नर्मदा नदीकाठच्या ३० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

गुजरात सरकारने सांगितले की, सरदार सरोवर धरणाच्या पाणी पातळीमध्ये ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भरुच, नर्मदा आणि वडोदरा जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा