पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी विनय आणि मुकेशला सुप्रीम कोर्टाकडून तारीख

सर्वोच्च न्यायालय

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तारीख जवळ येत आहे. याचदरम्यान फाशीची शिक्षा झालेल्या दोन दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पिटिशन म्हणजेच सुधारात्मक याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख १४ जानेवारी निश्चित केली आहे. न्यायालयाने २२ जानेवारीला दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी केले होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात विनय आणि मुकेशच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करेल. या खंडपीठात न्या. एम व्ही रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, न्या आर एफ नरिमन, न्या. आर भानूमती आणि न्या. अशोक भूषण यांच्या नावाचा समावेश आहे. निर्भयाचा गुन्हेगार विनयने आपल्या याचिकेत म्हटले की, याचिकाकर्त्याची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, त्याचे आजारी आई-वडील यांच्यासह कुटुंबाचे आश्रित आणि कारागृहातील त्याचे चांगले वर्तन आणि त्याच्यामध्ये सुधारणेच्या मुद्द्यावर पर्याप्त विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर न्याय झालेला नाही. 

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेतच हवेः उपराष्ट्रपती नायडू

याचिकेत पुढे म्हटले की, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या निर्णयानंतर ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणाशी निगडीत किमान १७ प्रकरणात दोषींची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.