पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हल्ल्यानंतरही ऑन ड्युटीसाठी सज्ज झालेल्या महिला डॉक्टर म्हणाल्या...

डॉक्टर तृप्ती कटडारे

देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी कठीण परिस्थितीचा नेटाने सामना करत आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील इंदुरमध्ये देवदूत बनून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. १ एप्रिलला घडलेल्या या प्रकारानंतर त्याच ताकदीने सर्वजण दुसऱ्या दिवशी कामावर हजर झाले. 

'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'

या घटनेचा सामना करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती कटडारे यांनी शुक्रवारी रात्री उशीराने घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. त्या लोकांनी आमच्यावर दगड फेकीचा प्रकार का केला याची कल्पना नाही. पण आम्ही अशा गोष्टीनं मागे हटणार नाही.  बुधवारी इंदुर येथील बाखल परिसरात कोरोना संशयित वृद्ध महिलेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथकावर तेथील लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. या पथकात डॉक्टर तृप्ती कटडारे यांच्यासह नर्स आणि अंगणवाडी सेविकांचाही समावेश होता.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज

स्थानिक लोकांनी त्यांना रोखण्यासाठी दगडफेक केली. एवढेच नाही तर काठी आणि दांडकी हातात घेऊन वैदयकीय पथकाला पळवून लावण्यात आले होते.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत दिवसरात्र कष्ट करुन जनतेची सेवा करणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोध राज्य सरकारने कठोर कारवाई केली. वैद्यकीय पथकावर हल्ला करणाऱ्या सात पैकी चौघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Health workers on whom stones were pelted in Indore returned to carry out screening services for coronavirus