पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात विदेशी नागरिकांसह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ८ हजार ३५६ वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे २७३ रुग्णांचा मृत्यू झाला तर कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ३७६ वर पोहचला होता. तर २४ तासांमध्ये कोरोनाचे आणखी ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

नोकरदार आणि करदात्यांसाठी केंद्र सरकारचे ५ दिलासादायक निर्णय

लव अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्रात सर्वाधिक १२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये ३६, गुजरातमध्ये २२, पंजाबमध्ये ११ आणि दिल्लीमध्ये १९ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.' देशातील २७ राज्य आणि सर्व केंद्र शासित प्रदेशांपैकी कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर देशभरात आतापर्यंत ७१६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोनामुळे पुण्यात आज २ महिलांचा मृत्यू

तसंच, महाराष्ट्रात १ हजार ७६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून याठिकाणी १ हजार ०६९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू राज्य असून याठिकाणी ९६९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना केंद्र सरकारने २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तर, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा अवधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८९५ वर, १३४ नव्या रुग्णात भर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:health ministry says we had 979 positive cases now we have 8356 positive cases in country