पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासादायक! एका दिवसात ७०५ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात एका दिवसात तब्बल ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत ३ हजार २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. 

पुढील सूचना येईपर्यंत रॅपीड टेस्ट करु नका, ICMR कडून राज्यांना आदेश

देशावर असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटा दरम्यान थोडा दिलासा देणारी माहिती आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशात गेल्या १४ तासांमध्ये कोरोनाचे १ हजार ३३६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १८ हजार ६०१ वर पोहचला आहे. तर भारतामध्ये २३ राज्यातील ६१ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

कोरोना वॉरियर्सला शहिदांचा दर्जा देणार, ओडिशा सरकारची घोषणा

दरम्यान, रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याची तक्रार आयसीएमआरकडे आल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस रॅपीट टेस्टचा वापर तूर्तास करु नका, असे आयसीएमआरने सांगितले आहे. आतापर्यंत देशात ४ लाख ४९ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास ३३ हजार चाचण्या सोमवारी करण्यात आल्या असल्याचे एमआरसीने सांगितले. 

देशातील गरीब कधी जागे होणार म्हणत राहुल गांधींची पुन्हा सरकारवर टीका