पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ४०६७ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे. मागील २४ तासांत ६९३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत २९१ रुग्ण बरे झाले आहेत तर १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवशी ३० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४४५ कोरोना रुग्ण हे तबलिगी जमातीशी निगडीत आहेत. 

कोरोना: पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात आतापर्यंत समोर आलेल्या कोरोना बाधितांच्या प्रकरणात ७६ टक्के पुरुष तर २४ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत रुग्णात ७३ टक्के पुरुष आणि २७ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. 

वयाच्या हिशोबाने पाहिले तर ७ टक्के रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी आहेत. ३० टक्के रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. ६३ टक्के मृत हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. 

जे आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत  त्यांनीच हायड्रोक्सिक्लॉरोक्वीन घ्यावे, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला. याच्या प्रभावाबाबत अजून पुरावे आलेले नाहीत. सामुदायिक स्तरावर याचा वापर करावा याचे पुरेसे पुरावे नाहीत, असेही ते म्हणाले. 

देशातील काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यातः एम्स संचालक

२५ हजार तबलिगी क्वारंटाइन

तबलिगी जमातीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ हजारहून अधिक लोकांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. हरयाणामध्ये ५ गावांना सील करण्यात आले आहे. तबलिगी जमातीशी निगडीत २०८३ विदेशींची ओळख पटली आहे. यापैकी १७५० जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. 

५ लाख रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर

आयसीएमआरकडून सांगण्यात आले की ५ लाख रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी २.५० लाख किटची डिलिव्हरी ८-९ तारखेपर्यंत मिळेल.