पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'१.७ कोटी पीपीई किटची ऑर्डर दिली, व्हेंटिलेटर, N-95 मास्कचा पुरवठा सुरु'

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल

देशात सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात N-95 मास्क, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट या तीन वैद्यकीय उपकरणांची मोठी चर्चा सुरु आहे. या तिन्ही उपकरणांवरुन मंत्रिसमूहाच्या बैठकीत चर्चा झाली. कोरोना विषाणूविषयक माहिती देण्यासाठी आयोजित दैनंदिन पत्रकार परिषदेत आज आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी देशात २० कंपन्यांकडून याचे उत्पादन सुरु झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर यावरुन आपली स्थितीही स्पष्ट केली आणि पीपीई किटची कधी आवश्यकता असते हेही सांगितले. 

तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

लव अग्रवाल म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने १.७ कोटी पीपीई किट आणि ४९ हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे. त्याचा पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. सैनिकाच्या रुपात सेवा करत असलेले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समाजाचे संपूर्ण समर्थन मिळायला हवे यावरही मंत्रिसमूहाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

फेक न्यूजपासून वाचण्याचा सल्ला देताना ते म्हणाले की, पीपीईची प्रत्येकवेळी आवश्यकता नसते, हे आपल्याला समजले पाहिजे. ज्या गोष्टीची जिथे गरज आहे, तिथेच त्याचा वापर केला जावा. यासाठी आरोग्यमंत्रालयाची मार्गदर्शिका उपलब्ध आहे. ती सर्वांनी वाचावा. 

कोरोनाचे जगभरात १५ लाख रुग्ण; ८८,५०० नागरिकांचा मृत्यू

फक्त हाय रिस्क झोनमध्येच पीपीईचा वापर केला जातो, हे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये हेडगेअर, मास्क, बूट आणि कव्हर असते. मॉडरेटसाठी फक्त एन-95 मास्क आणि ग्लोव्हजची आवश्यकता असते. गरजेनुसार राज्यांना पीपीई किट पाठवण्यात आले आहेत, असेही त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Health Ministry joint secretary Lav Aggrawal Says order for PPE ventilator and N 95 mask has been placed to fight with coronavirus