पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात सरकार नागरिकत्व विधेयक मांडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, काश्मीर, देशासमोरील आर्थिक संकट यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधारी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. तसेच भाजपपासून काडीमोड घेतलेली शिवसेनाही विरोधी बाकावर बसणार आहे. 

अयोध्या निकाल : ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड देणार आव्हान

हिवाळी अधिवेशनात वादग्रस्त नागरिकत्व विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. हे विधेयक मंजूर करुन घेण्यास यश आले तर शेजारील देशांमधून भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या मुस्लिम वगळता अन्य धर्मीयांना  ( शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) भारतीय नागरिकत्व मिळेल.

अयोध्या प्रकरण: निकाल देणाऱ्या 'त्या' न्यायाधीशांना 'झेड' सुरक्षा

हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबपर्यंत चालणार असून त्यात २७ विधेयके मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जाणार आहेत. या अधिवेशनात सरोगसी नियंत्रण विधेयक, व्यक्तिगत माहिती संरक्षण,  औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, चिट फंड दुरुस्ती विधेयक यांसारखी महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत.  त्याचप्रमाणे ई- सिगारेटवर केंद्र सरकारनं बंदी  घातली आहे.  त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या वटहुकमाचेही कायद्यात रूपांतराला प्राधन्य दिलं जाईल. 

पुन्हा भाजप-सेनेचे सरकारच येईल, आठवलेंना अजूनही आस

विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा होईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिलं.