पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकात राजकीय संकट, देवेगौडांचे मध्यावधी निवडणुकीचे संकेत

एचडी देवेगौडा

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये सध्या सर्वकाही आलबेल  नसल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एच डी देवेगौडा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हे संकेत मिळाले आहेत. कर्नाटकमध्ये कधीही मध्यावधी निवडणूक होऊ शकतात, याबाबत कोणतीच शंका नाही. काँग्रेसने आम्हाला पाच वर्षांसाठी पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. परंतु, त्यांची वर्तणूक कशा पद्धतीची आहे पाहा. पण आमचे लोक स्मार्ट आहेत, असे देवेगौडा यांनी बंगळुरु येथे म्हटल्याचे एएनआयने म्हटले आहे. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडचे सरकार असून कुमारस्वामी हे मुख्यमंत्री आहेत.

तत्पूर्वी, काँग्रेस आणि जेडीएसच्या काही नेत्यांकडून आघाडी सरकारबाबत वारंवार सार्वजनिकरित्या वक्तव्ये केली जात असल्याचे देवेगौडा यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील नेत्यांचे मतभेद समोर आले होते.

दोन्ही पक्षांनी एकून लोकसभेच्या २८ जागा लढवल्या होत्या. पण त्यांना केवळ १-१ जागाच जिंकता आल्या. भाजपने २५ जागांवर विजय मिळवला. 

काँग्रेसचे २० आमदार संपर्कात, येडियुरप्पांचा दावा

मी पहिल्या दिवसापासून हे पाहत आहे. मला याचा खूप धक्का बसला आहे. हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगत आहे. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. कृपया कर्नाटकातील तुमच्या सर्व नेत्यांना सांगा, असे देवेगौडा म्हणाले. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेसने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली असती तर पक्षाची कामगिरी चांगली राहिली असती असे म्हटले होते. यावर देवेगौडा यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. 

मी त्यांना आघाडी सरकार नको असे म्हणालो होतो. पण परमेश्वर आणि मुनियप्पा यांनी आमच्याशी संपर्क केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला तसे आदेश असल्याचे म्हटले होते, असेही देवेगौडा यांनी सांगितले.

'राहुल गांधी पंतप्रधान होणार असतील, तर मी त्यांच्यासोबत'