पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकात शाळेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, विद्यार्थ्यांच्या नाटकात पंतप्रधानांचा अवमान

नाटकासाठी संहिता कोणी लिहिली होती याची पोलिस चौकशी करीत आहेत.

कर्नाटक येथील बिदरमधील एका शाळेत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाळेतील मुलांकडून एक नाटक सादर करून घेण्यात आले. या नाटकावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील इतरांबद्दल अवमानकारक विधाने करण्यात आली. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका विद्यार्थ्याच्या आईला पोलिसांनी अटक केली. या सगळ्या प्रकारावरून आता कर्नाटकमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

'...तर शरद पवारांच्या रुपात मराठी माणूस पंतप्रधान होईल'

बिदरमधील शाहीन प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात शाहीन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौसिफ माडीकेरी म्हणाले, आमच्या समूहाच्या देशात ४३ शैक्षणिक संस्था आहेत. २० हजार विद्यार्थी आमच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतात. पण या प्रकरणात आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका विद्यार्थ्याच्या आईला तुरुंगात डांबणे दुर्दैवी आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी होईल. तिथे आम्ही आमची बाजू मुद्देसूदपणे मांडू. आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, यावर आजही ठाम आहोत. शाळेतील एका १०-११ वर्षांच्या मुलाने अनवधानाने एखादा शब्द उच्चारला असेल. तरी त्यावरून शाळेविरोधात देशद्रोहाचा खटला कसा काय दाखल केला जाऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.    

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी या शाळेविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२४ (ए), ५०४ आणि १५३ नुसार शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते नीलेश रकशयाल यांनी तक्रार दाखल केली होती. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचे कृत्य शाळेमध्ये केले गेल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

चीन: 'कोरोना'च्या बळींचा आकडा ४९० वर, २४ हजार लोकांना विषाणूची लागण

या तक्रारीनंतर कर्नाटक पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका फरीदा बेगम आणि शाळेतील एका विद्यार्थ्याची आई नाजामुन्निसा यांना ३० जानेवारीला अटक केली. नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.