पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डान्सर सपना चौधरीचा अखेर भाजपात प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश करताना सपना चौधरी (ANI)

हरयाणाची लोकप्रिय नृत्यांगणा आणि गायिका सपना चौधरी अखेर अधिकृतरित्या भाजपमध्ये सहभागी झाली आहे. रविवारी भाजपच्या एका कार्यक्रमात सपना चौधरीने भाजपचे सदस्यत्व घेतले. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन सिंह आदी ज्येष्ठ नेते उपस्थितीत होते. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये भाजपचे सदस्यत्व अभियान आहे. याच कार्यक्रमात सपना चौधरीने भाजपचे सभासदत्व घेतले. 

भगवा भारताचा गौरवशाली रंग, टीम इंडियाच्या जर्सीला शशी थरुरांचा पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या आधी सपना चौधरीच्या पक्षप्रवेशावर 'सस्पेन्स' निर्माण झाला होता. माध्यमांमध्ये काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यावरुन सपना चौधरीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले होते. परंतु, सपना चौधरीने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सपना चौधरीने सदस्यत्व स्वीकारल्याची कागदपत्रेच माध्यमांना दाखवली होती. त्यानंतरही सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर मनोज तिवारी यांच्याबरोबर ती प्रचारावेळी दिसली होती.

आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यासह अ‍ॅथलीट अंजू बॉबी भाजपमध्ये

सपना चौधरी ही हरयाणातील लोकप्रिय गायिका आणि नृत्यांगणा आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने आयटम साँग्ज केले आहेत. त्याचबरोबर ती छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्ये दिसली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Haryanavi dancer Sapna Chaudhary joins BJP at the partys membership drive program in Delhi