पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेज बहादुर यादव हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

तेज बहादुर यादव

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. हरियाणाच्या जननायक जनता पक्षाने गुरुवारी ३० उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आलेले जवान तेज बहादुर यादव यांना जननायक जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. तेज बहादुर कर्नाल मतदार संघातून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

NCPच्या दुसऱ्या यादीत पंकज भुजबळ, बबनदादा शिंदेंसह २० जणांना संधी

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदार होणार असल्याचे सांगितले होते. तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. २१ सप्टेंबरपासून दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली होती. महाराष्ट्रातील २८८ सदस्य असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे तर हरियाणाचा ९० सदस्य असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ २ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. 

उद्धव-रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य उमेदवारी अर्ज भरणार