पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवालांच्या लेकीचा भाजपच्या २०० स्टार प्रचारकांना सवाल

हर्षिता केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी दोन दिवस बाकी असताना राज्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची लेक वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. विधानसभेच्या प्रचारावेळी केजरीवालांना दहशतवादी संबोधल्याचा राग व्यक्त करताना हर्षिताने भाजपवर निशाणा साधलाय. भाजप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असल्याचे तिने म्हटले आहे. आरोग्य सेवा आणि शिक्षण मोफत देणे हा दहशतवाद आहे का? असा संतप्त सवाल व्यक्त करत तिने भाजपवर तोफ डागली.

कर्नाटकात शाळेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, नाटकात पंतप्रधानांचा अवमान

एएनआयच्या वृत्तानुसार हर्षिता केजरीवाल म्हणाली की, भाजपवाले  खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत. जनतेला आरोग्य सेवा मोफत देणे, त्यांना शिक्षित करणे, पाणी व्यवस्थेत सुधारणा करणे ही दहशतवाद्याची कामे आहेत का? असा सवाल उपस्थित करत तिने वडिलांनी नेहमीच जनतेच्या भल्यासाठी काम केल्याचे सांगितले. हर्षिता पुढे म्हणाली की, माझे वडिल नेहमीच समाज कार्याचा विचार करतात. ते माझ्यासह भाऊ आणि आजी-आजोबांना दररोज सकाळी ६ वाजता उठवतात. भगवतगीता वाचनानंतर ते आम्हाला  'इंसान से इंसान का हो भाईचारा' अशी शिकवण गाण्याच्या माध्यमातून देतात. याला दहशतवाद म्हणायचे का? अशा शब्दांत हर्षिताने आपल्या भावना बोलून दाखवल्या.

चीन: 'कोरोना'च्या बळींचा आकडा ४९० वर, २४ हजार लोकांना विषाणूची लागण

२०० खासदार आणि ११ मुख्यमंत्र्यांना घेऊन नाहक आरोप करणाऱ्यांना दिल्लीकर साथ देणार नाहीत. २ कोटी आम जनता आमच्यासोबत असून ११ फेब्रुवारीला ते आपल्या मताची ताकद दाखवून देतील, असेही हर्षिताने म्हटले आहे. भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्यानंतर केंद्रीय मंत्री आणि दिल्ली विधानसभा निवडणूत प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी केजरीवाल दहशतवादी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या ७० जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ११ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Harshita Kejriwal Delhi CM Arvind Kejriwal daughter says Is it terrorism if children are made educated