पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता, पत्नीचा दावा

हार्दिक पटेल २० दिवसांपासून बेपत्ता

गुजरात काँग्रेस नेता आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारा हार्दिक पटेल गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्याची पत्नी किंजल पटेल हिनं केला आहे. त्याचप्रमाणे  हार्दिकला गुजरात सरकारकडून लक्ष्य केलं जात आहे, असाही आरोप तिनं केला आहे.'माझे पती २० दिवसांपासून बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत, कसे आहेत याची कोणतीही माहिती मला नाही. आम्ही सध्या खूप दु:खी आहोत, अशा प्रकारे ताटातुट होण्यामागचं दु:ख कोणीही समजू शकत नाही', असा व्हिडिओही किंजलनं फेसबुकवर शेअर केला आहे. 

पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच

पाटीदार समाजातील नेत्यांवर असलेले सर्व गुन्हे मागे घेतले असल्याचं २०१७ मध्ये या सरकारनं सांगितलं. मात्र आता ते एकट्या हार्दिकला का लक्ष्य करत आहे. पाटीदार समाजाच्या चळवळीत सहभागी झालेल्या आणि आता भाजपत गेलेल्या इतर दोन नेत्यांना का हात लावला जात नाही? असाही प्रश्नही तिनं विचारला आहे. हार्दिकनं पाटीदार समजाशी संपर्क साधू नये, त्यांच्या समस्या जाणून घेऊ नये असंच या सरकारला वाटत आहे, असंही तिनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटलांना शरद पवारांवर करायची आहे 'पीएचडी'

१८ जानेवारी रोजी त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर चार दिवसांनी हार्दिक पटेलला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर पाटण आणि गांधीनगर जिल्ह्यातील गुन्ह्यासंदर्भात त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले होते. २४ जानेवारीला याप्रकरणातही जामीन मंजूर झाला होता. ७ फेब्रुवारीला आणखी एका खटल्याच्या सुनावणीमध्ये गैरहजर राहिल्याने त्याच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अटकेसाठी पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.  मात्र २० दिवसांपासून हार्दिक पटेल हे कुठे आहेत हेच आम्हाला ठावूक नाही असा दावा त्याच्या पत्नीनं केला आहे.