पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हरभजन सिंग शुभेच्छा द्यायला गेला आणि स्वतःच ट्रोल झाला!

हरभजन सिंग

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान २ चे सोमवारी यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर अनेकांनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये पाकिस्तानवर निशाणा साधला. पण अनेक नेटिझन्सना अशा प्रकारे पाकिस्तानवर निशाणा साधणे भावले नाही आणि त्यांनी थेट हरभजन सिंगवरच टीका केली. 

आपल्या ट्विटमध्ये हरभजन सिंगने म्हटले आहे की, काही देशांच्या राष्ट्रध्वजावर चंद्र आहे. तर काही देशांनी आपला राष्ट्रध्वज चंद्रावर फडकवला आहे. या ट्विटसाठी त्याने पाकिस्तानसह इतर काही देशांचे राष्ट्रध्वज आपल्या ट्विटमध्ये वापरले. त्याची हीच कृती काही नेटिझन्सना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी थेट हरभजन सिंग याच्यावरच टीका केली.