पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उमर खालिदवर हल्ला करणाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी

शिवसेना

महाराष्ट्राबरोबर हरियाणातही विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. हरियानामध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता उमर खालिदवर दिल्लीत हल्ला करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेने हरियाणातील बहादूरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

जेटलींच्या जागेवरुन सुधांशु त्रिवेदी राज्यसभेवर बिनविरोध

उमेदवारी मिळाल्यानंतर नवीन दलाल यांनी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेचे सदस्यत्व घेतल्याचे सांगितले. राज्यातील प्रमुख पक्षांवर दलाल यांनी टीका केली. भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष गाय, शेतकरी, शहीद जवान आणि गरिबांच्या नावावर केवळ राजकारण करतात. त्यामुळे आपण शिवसेनेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले.

राफेलची पूजा केल्यानंतरही काँग्रेसला वाईट वाटलेः अमित शहा

गो हत्येसह इतर अनेक मुद्द्यांवर शिवसेनेचे स्पष्ट धोरण असल्यामुळे पक्षात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून दलाल हे गोरक्षासारख्या मुद्द्यांवर काम करत आहेत. ते म्हणाले की, भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष केवळ गाय आणि शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करतात, असे मला वाटते. मला माझ्या मतदारसंघातून मोठे समर्थन मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

हरियाणातील बहादूरगड विधानसभा मतदारसंघातून उभे असलेल्या दलाल यांचा सत्ताधारी भाजपचे आमदार नरेश कौशिक, काँग्रेसचे राजेंद्रसिंह, आयएनएलडीचे नफेसिंह राठी तसेच २० इतर उमेदवारांशी सामना आहे. दलाल यांनी इतरांच्या मदतीने गेल्या वर्षी १३ ऑगस्टला दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये उमर खालिदवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने उपस्थितांना विचारला प्रश्न

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:harayana assembly election 2019 shiv sena gives ticket to attacker of jnu student leader umar khalid