पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Teachers Day 2019 : गुगलची डुडलद्वारे गुरु वंदना

शिक्षक दिन  २०१९

आई वडिलांनंतरचा दुसरा गुरू म्हणजे शिक्षक होय. शिक्षक  हा प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देतो, घडवतो. नवा दृष्टीकोन, नवे  विचार देतो. ज्ञानसागरात आपल्याला पोहायला शिकवतो अशा या शिक्षकांप्रती सन्मान करण्याचा हा दिवस होय. म्हणूनच दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 

 गुगलनं देखील शिक्षक दिनानिमित्तानं डुडलद्वारे गुरु वंदना वाहिली आहे. काही खास दिवशी गुगल विशेष डुडल तयार करतं.  डुडलद्वारे त्या दिनाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. यावेळचं डुडलंही तसंच विशेष करण्यात आलं आहे. हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

Teachers’ Day: राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी अशा दिल्या शुभेच्छा!

तर दुसरीकडे शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनीही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजलीही वाहिली आहे.