पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Dussehra 2019 : दसऱ्याला सोने का लुटतात?

दसरा २०१९

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं आपल्याकडे म्हणतात. दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याला विजयादशमीही म्हणतात. विजयादशमीच्या दिवशी देवीनं महिषासुरमर्दन केले. याच दिवशी रामानं रावणाचा पराभव केला. असत्यावर सत्यानं विजय मिळवला म्हणून रावणाचं दहन करून वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. 

पूर्वी राजे सीमोल्लंघन करून नव्या मोहीमेवर जात. विजयादशमीच्या दिवशी शमीपूजन करण्याची, सोने लुटण्याची प्रथाही आहे. यादिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटतात यामागे एक अख्यायिकाही सांगितली जाते. 

Dussehra 2019 : भारतातल्या या गावात ६ महिन्यांपूर्वी रावण दहन

वरतंतु ऋषींच्या कौत्स नावाच्या शिष्यास गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. मात्र ऋषी गुरुदक्षिणा घेण्यास तयार नव्हते. कौत्स आग्रह धरू लागला. अखेर तुला चौदा विद्या शिकवण्याच्या बदल्यात मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे त्याही एकाच दात्यानं दिलेल्या असाव्यात अशी अट वरतंतु ऋषींनी ठेवली. कौत्स मुद्रा मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. मात्र संपत्ती यज्ञयागात दान करणाऱ्या रघुराजाकडे तेवढी संपत्ती नव्हती. 
कौत्साचा हिरमोड झाला. राजाकडून  रिकाम्या हातानं एखादा याचक परतोय ही बाब राघुराजाच्या मनाला लागली. इंद्रावर स्वारी करून कौत्साला सुवर्ण मुद्रा देण्याचं राजानं ठरवलं. मात्र ही बाब इंद्राला आधीच कळली आणि त्यानं आपटय़ाच्या वृक्षांवर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. कौत्साला हे पाहून आनंद झाला. त्यानं गुरुदक्षिणेसाठी आपल्या वाट्याच्या १४ कोटी सुवर्ण मुद्रा गोळा केल्या.

Dussehra 2019 :..म्हणून बैजनाथमध्ये रावण दहन होत नाही

मात्र तरीही धन उरलं होतं, अगदी पानापानांत धन होतं. हे धन राजानं गावातील लोकांना वाटायला सांगितलं. तो दिवस विजयादशमीचा होता तेव्हापासून दसऱ्यादिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे.