पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनानंतर चीनमध्ये हंता विषाणूचा कहर, वाचा सर्व माहिती

हंता विषाणू उंदरांच्या संपर्कात आल्यामुळे मनुष्यात पसरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूनंतर चीनमध्ये आता आणखी एका विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. चीनमधील युन्नान प्रांतात एका व्यक्तीचा हंता विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर #Hantavirus सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहे. हंता विषाणूने लोकांची चिंता आणखी वाढवली आहे. चीनमधील वुहान शहरातून ज्यापद्धतीने कोरोना विषाणू संपूर्ण जगात पसरला. त्याचप्रमाणे हंता विषाणू पसरेल अशी लोकांमध्ये भीती आहे.

हँडवॉशने हात धुवा, मगच किराणा माल मिळेल; सोलापुरात उपक्रम

अशावेळी कोरोना विषाणू आणि हंता विषाणू यात काय फरक आहे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हंता विषाणूचे संक्रमण कसे होते?  तो कसा पसरतो? हंता विषाणू जीवघेणा आहे का? या सर्वांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या मते, हंता विषाणूने संक्रमित व्यक्ती कामानिमित्त बसने शा़डोंग प्रांतात जात होता. तो हंता विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण होता. त्या बसमध्ये ३२ लोक प्रवास करत होते. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संकटाला आधीच गांभीर्याने घ्यायला हवे होते: राहुल गांधी

कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत १६,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर जगातील ३८२, ८२४ लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना विषाणूची लागण १९६ देशात झाली आहे. यावरुन कोरोना विषाणूची व्यापकता आपल्या लक्षात येईल. 

तज्ज्ञांच्या मते, हंता विषाणू उंदरांच्या संपर्कात आल्यामुळे मनुष्यात पसरत आहे. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने आपल्या वेबसाईटवर सांगितले आहे की, घराच्या आत आणि बाहेर उंदीर हंता विषाणूचे संक्रमण पसरवण्याचे सुरुवातीचे कारण असू शकते. जर एखादी व्यक्ती पूर्णपणे सुदृढ असली तरी हंता विषाणूच्या संपर्कात आल्यास त्यालाही याचा धोका आहे. 

परंतु, कोरोना विषाणूप्रमाणे हंता विषाणू मनुष्यापासून मनुष्यात पसरत नाही. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, जर एखादा व्यक्ती उंदराचे मल-मूत्र किंवा त्याच्या बिळातील वस्तूंना स्पर्श केल्यानंतर आपल्या नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श केल्यास हंता विषाणूचे संक्रमण होऊ शकते. 

लक्षणे
कोरोना विषाणू आणि हंता विषाणूची लक्षणे बहुतांश एकसारखी आहेत. दोन्हीमध्ये ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, अंगदुखी होते. याशिवाय हंता विषाणूने संक्रमित झाल्यानंतर पोटदुखी, उलटी, डायरियाही होतो. उपचारास उशीर झाल्यानंतर संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसात पाणी भरते. 

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

हंता विषाणूची सुरुवात कुठून झाली
हंता विषाणूचे पहिले प्रकरण चीनमधून आलेले नाही. पहिल्यांदा या विषाणूचे प्रकरण १९९३ मध्ये दक्षिण पश्चिमी अमेरिकेतून समोर आले होते. ऍरिजोना, न्यू मेक्सिको, कोलॅराडो आणि उटाह येथील होते. न्यू मेक्सिकोमध्ये या विषाणूने एक युवक आणि त्याच्या भावी वधूचा मृत्यू झाला होता. सीडीसीने आपल्या अहवालात म्हटले की, कॅनडा, अर्जेंटिना, बोलाव्हिया, ब्राझील, चिली, पनामा, पॅराग्वे आणि उराग्वे येथूनही अशी प्रकरणे समोर आली आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Hantavirus killed one man in China know difference between coronavirus and hantavirus read symptoms diagnosis and prevention