पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात २०१८ मध्ये ५७६३ शेतकरी आत्महत्या, निम्मी प्रकरणं महाराष्ट्रातील

शेतकरी

वर्ष २०१८ मध्ये देशात एकूण ५७६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २२३९ आत्महत्या या महाराष्ट्रातील असल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. महाराष्ट्रातील स्थितीचे गांभीर्य पाहता सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षकारांबरोबरील चर्चांना वेग दिला आहे. 

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राशिवाय कर्नाटकमध्ये १३६५, तेलंगणामध्ये ९००, आंध्र प्रदेशमध्ये ३६५, मध्य प्रदेश ३०३ आणि पंजाबमध्ये २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी पाऊल उचलूनही आत्महत्येचे प्रमाण न घटणे ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले. 

देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

ते पुढे म्हणाले, शेतकरी कल्याणाशी निगडीत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना लागू आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात निगराणी तंत्रही आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात, ही चिंतेची बाब आहे.

सरकारच्या प्रयत्नांबद्दल सांगताना ते म्हणाले की, किसान सम्मान निधी योजने अंतर्गत ६.११ कोटी शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात स्थानांतरित करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाकडे ८ कोटी शेतकऱ्यांचा डाटा संरक्षित आहे. यामध्ये प्रधानमंत्री कृषी बीमा योजने अंतर्गत ५८५९२ कोटी रुपयांची रक्कम पीकांच्या नुकसानीच्या भरपाईच्या रुपात शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तक्रार दाखल