पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधींनी या दोन नेत्यांचा राजीनामा स्वीकारला

सोनिया गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन प्रमुख नेत्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दिल्लीचे प्रभारी प्रदेशाध्य पीसी चोका आणि  आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोपडा यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दोन्ही नेत्यांनी योगदानाचे कौतुक  केले आहे. 

शेतकऱ्यांचं पीकविमा कर्ज माफ! राज्य सरकारने काढला जीआर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. निकालानंतर पक्षातील नेते एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरु आहे. काँग्रेसने ७० पैकी ६६ जागांवर निवडणुक लढवली होती. यातील ६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२ जागा जिंकत आपने सत्ता राखली. भाजपने पूर्वीपेक्षा पाच जागा वाढवत ८ जागेवर विजय मिळवला आहे.

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेसंदर्भातील तक्रारीची EC कडून दखल

पीसी चोका यांनी काँग्रेसच्या पराभवाची सुरुवात ही शिला दिक्षित यांच्या नेतृत्वाखालीच झाल्याचे म्हटले होते. २०१३ मध्येच दिल्लीतील काँग्रेसला धक्का बसण्यास सुरुवात झाली, असा उल्लेख त्यांनी एका ट्विटमध्ये केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. यावर सारवासारव करताना त्यांनी शिला दिक्षित यांच्यावर टीका करत नाही तर सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर काँग्रेसच्या मतही आपकडे वळली आहेत. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवणे कठिण आहे, असे भविष्यही त्यांनी वर्तवले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:hakti Sinh Gohil interim AICC incharge of Delhi Sonia Gandhi accepts resignation of Subhash Chopra PC Chacko