पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद दोषी

हाफिज सईद

लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संगटनेचा म्होरक्या आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पाकिस्तानच्या गुजरानवाला न्यायालयात आज हाफिज सईदला हजर करण्यात आले होते. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादाला आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. हे प्रकरण पाकिस्तानच्या गुजरात न्यायालयामध्ये हस्तांतरीत करण्यात आले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील लाखो कामगारांना एप्रिलपासून कामावरून काढले 

हाफिज सईदला 17 जुलै रोजी लाहोरच्या गुजरांवाला येथे अटक करण्यात आली होती. दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करत त्याला अटक केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईद दहशतवादी विरोधी न्यायालयामध्ये हजर होण्यासाठी लाहोरवरुन गुजरानवाला येथे आला होता. तेव्हाच त्याला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ केली होती. 

डिसेंबरपासून NEFT सेवा २४ तास उपलब्ध
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाफिज सईद आणि त्याच्या तीन साथिदारांना पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने मदरशासाठी अवैधरित्या जमिनीचा वापर केल्या प्रकरणात अटकपूर्व जामीन दिला होता. या प्रकरणात त्यांना 3 ऑगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. न्यायालयाने हाफीज सईद, अमीर हमजा आणि मलिक जफर या तिघांना 50-50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होती.  

पूरग्रस्तांना तातडीची मदत करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश