पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला लवकरच अटक

हाफिज सईद

मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड आणि जमात उद दावाचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईद लवकरच कारागृहात कैद असेल. गुरुवारी पाकिस्तानी पोलिसांनी दहशतवादी हाफिज सईद आणि त्याच्या १२ सहकाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती दिली. पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईद आणि त्याच्या १२ निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक केली जाणार आहे. 

पुलवामा हल्ल्यासाठी RDX, अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे स्पष्ट

पाकिस्तानने हा निर्णय दहशतवादी समूह आणि दहशवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अर्थसाह्यावर लगाम लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबावामुळे घेतला आहे. पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) बुधवारी म्हटले की, दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठाप्रकरणी जमात उद दावाच्या १३ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीटीडीने म्हटले आहे की, दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठ्याविरोधात सीटीडी पंजाबने केलेल्या कारवाईत हाफिज सईद आणि इतर नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमात उद तावा, लष्कर ए तोयबा आणि एफआयएफच्या प्रकरणांचा तपास सुरु आहे. दहशतवाद्यांना पैसे जमा करण्यासाठी ट्रस्टचा वापर केल्याप्रकरणी तपास सुरु आहे.

Video : #INDvBAN शमीच्या धुलाईनंतरची अप्सरा सोनालीची रिअ‍ॅक्शन!