पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कमल हासन यांची जीभच कापली पाहिजे'

कमल हासन

ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी हिंदू दहशतवादाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. तमिळनाडूतील सध्याचे मंत्री के. टी. राजेंथ्र बालाजी यांनी कमल हासन यांची जीभच कापली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. बालाजी हे अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते आहेत.

हिंसाचाराला खतपाणी घालेल, असे वक्तव्य कमल हासन यांनी केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे, असे बालाजी यांनी म्हटले आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. त्यामुळे कमल हासन यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्याबद्दल त्यांची जीभच कापायला हवी, असे बालाजी म्हणाले. केवळ मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी कमल हासन यांच्याकडून असे वक्तव्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू आणि तो नथुराम गोडसे- कमल हासन

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे, असे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. मी केवळ मुस्लिमांसाठी असे म्हणत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे मते मांडण्यासाठी अण्णा द्रमुकचे नेते बालाजी प्रसिद्ध आहेत. कमल हासन समाजात फूट पाडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला आहे.