पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुलालाई! पाकविरोधात मानवाधिकाराच्या लढ्यातील नवा चेहरा

गुलालाई इस्माइल

पाकिस्तानमधून 'मुश्किल'नं आपली सुटका करुन अमेरिकेत पोहचलेली आणि मानवाधिकारासाठी झटणारी महिला कार्यकर्ता गुलालाई इस्माइलने सध्याच्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवारी अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भाष करत होते. त्यावेळी ही महिला न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात न्याय मागताना दिसली.   

विमानात बिघाड, पाकला जाणारे इम्रान खान यांचे विमान पुन्हा न्यूयॉर्कला

गुलालाई इस्माइल महिन्याभरापूर्वीच ती न्यूयॉर्कमध्ये पोहचली होती. पाकिस्तानमध्ये मुहाजिरो, पश्तुनों, बलूचिया आणि सिंधिया यासारख्या अन्य अल्पसंख्याकांवर पाकमध्ये होणाऱ्या अत्याचाराविरोधात तिने आवाज उठवला.  'नो मोर ब्लँक चेक्स फॉर पाकिस्तान' (पाकिस्तानसाठी कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही) आणि 'पाकिस्तान आर्मी स्टॉप मेडलिंग इन पॉलिटिक्स' (पाकिस्तानी लष्कराने राजकारणात नाक खूपसणे बंद करावे) अशी घोषणाबाजी करत तिने पाकचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. 

अमेरिकेतील पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याची हत्या

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना गुलालाई म्हणाली की, दहशतवाद्यांचा नावाखाली पाकमध्ये निरापराध लोकांची हत्या केली जात आहे. याठिकाणी हजारो लोकांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. लष्कराकडूनही लोकांवर अत्याचार सुरु आहे. देशद्रोहाच्या आरोपानंतर पाकमधून पळ काढावा लागला, असेही गुलालाई हिने म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्ता गुलालाई पुढे म्हणाली की, पाकिस्तानी लष्कराकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. लष्कराकडून होणारा अत्याचार रोखावा, अशी मागणीही तिने संयुक्त राष्ट्राकडे केली.