पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीक-टॉक व्हिडीओमुळे महिला पोलिसाचं निलंबन

अर्पिता चौधरी

पोलिस स्थानकात टीका- टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करणं गुजरातमधील महिला पोलिसाला महागात पडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचं निलंबन करण्यात आलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज  पोलिस स्थानकात कार्यरत असणारी महिला पोलिस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टीक- टॉक व्हिडीओ तयार केला. स्थानकात असलेल्या तुरुंगाच्या समोरच ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करत होती. हा  व्हिडीओ २० जुलै रोजी स्थानकात चित्रीत करण्यात आला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडिया साईटवर तो व्हायरल झाला. 

'कमलनाथ यांचे सरकार पडले तर आम्हाला जबाबदार धरू नका'

अर्पिता चौधरी हिच्यावर लंघनाज  पोलिस स्थानकाकडून निलंबनाची कारवाई केली आहे. 'चौधरी यांनी नियम पायदळी तुडवले आहेत. कामावर असताना तिनं वर्दीही परिधान केली नव्हती. तिनं हा व्हिडीओ पोलिस स्थानकात चित्रीत केला. पोलिसांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे.' तिनं हे नियम मोडले म्हणून तिच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पोलिस उपायुक्त मंजिता वंझारा म्हणाले.