पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदाबादमधील पंतग महोत्सवात अमित शहांची पतंगबाजी

अमित शहा

गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय पंतग महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय. विशेष म्हणजे गुजरात सरकारने या लक्षवेधी पतंग महोत्सवासाठी खास पुढाकार घेतला आहे. पंतग उद्योगाला चालना मिळेल अशी सरकारची धारणा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अहमदाबादमधील समारोहाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या महोत्सवात सहभागी होत पतंगबाजी देखील केली.  
अहमदाबाद येथील कार्यक्रमात अमित शहा यांच्यासोबत अन्य काही दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील सहभाग होता. अहमदाबादमध्ये मंगळवारी आंतरराष्ट्रीय पतंगोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील पंतग उद्योगामधील उलाढाल ६०० कोटींच्या घरात पोहचल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रक-बसच्या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

मुख्यमंत्री रुपानी म्हणाले की, २० कोटींची उलाढाल असणारा पंतग व्यापार सरकारच्या प्रोत्साहनामुळे ६०० कोटींच्या घरात पोहचला आहे. साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आयोजित आंतरराष्ट्रीय पतंगोत्सवामध्ये ४० हून अधिक देशातील १५० आणि १२ राज्यातील ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगबेरंगी पंतगबाजीची झलक यावेळी पाहायला मिळाली. 

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

गुजरात राज्यातील अनेक परिवारांचा उदरनिर्वाह हा पंतग विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. पतंग उत्सवाच्या काही महिन्यापूर्वीपासून याठिकाणी पतंग तयार करण्याचे काम सुरु केले जाते. २०१२ च्या एका सर्वेनुसार, राज्यात पंतग व्यवसायातील उलाढालही १७५ कोटी इतकी होती. या व्यवसायामुळे जवळपास ३० हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचा उल्लेखही सर्वेमध्ये करण्यात आला होता. सरकारच्या प्रोत्साहनानंतर या व्यवसायाची ताकद वाढली आहे. २०१७-१८ मध्ये या व्यवसायाची उलाढाल ही ६२५ कोटीच्या घरात पोहचल्याचा दावा करण्यात येत आहे. जवळपास १ लाख २८ हजार लोक या व्यवसायावर अवलंबून असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: gujarat union home minister amit shah flies a kite during uttarayan programme ahmedabad makar sankranti 2020